August 9, 2025

महात्मा बसवेश्वरमध्ये परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

  • लातूर – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात दर रविवारी होणाऱ्या एमएचटी-सीईटी/नीट/जेईई पीसीबी आणि पीसीएम परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच संपन्न झाला.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई हे होते तर विचारमंचावर उपप्राचार्य प्रा. संजय पवार,पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, समन्वयक प्रा. वनिता पाटील, प्रा.एन.एन. खानापुरे, प्रा.पी.एस.शेळके,प्रा. एच.एन.शेख यांची उपस्थिती होती.
    एमएचटी-सीईटी/नीट/जेईई पीसीबी ग्रुप मधून प्रथम देवकते सारथी सुनील,द्वितीय स्वामी वैभवी रवीभूषण,तृतीय जगदाळे विश्वजीत रामराव तर पीसीएम ग्रुपमधून प्रथम कास्ते ओम संभाजी, द्वितीय वाघमारे अनिकेत सुरेश,तृतीय ठोंबरे रामलिंग मंचक यांचा प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांच्या हस्ते क्रमिक व संदर्भ मार्गदर्शिका, लेखणी, गुलाबपुष्प आणि पेढे देवून सत्कार करण्यात आला.
    या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उतुंग यश संपादन करून आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नांना साकार करुन आपले जीवन समृद्ध करून आयुष्यामध्ये सर्वोच्च यश संपादन करावे असेही ते म्हणाले.
    यावेळी उपप्राचार्य प्रा.संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.वनिता पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे यांनी मानले.
    या कार्यक्रमाच्या यशस्ववितेसाठी नरेश वाडकर,अनिल कोळ्ळे, शुभम बिराजदार,बालाजी होनराव,श्रीशैल्य पाटील आणि संतोष राठोड यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!