पारा – बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती पारा येथे दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पारा येथील साठेनगर आणि मुख्य चौकात अण्णा भाऊंच्या प्रतिमांना अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अण्णाभाऊ साठेंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.साहित्यविषयक योगदान, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मोलाचा वाटा यातुन अण्णाभाऊचे मोलाचे विचार आजच्या तरूणांनी आत्मसात करून आपला उद्धार करावा असे आवाहन अक्षय शिनगारे यांच्यामार्फत करण्यात आले. जयंती साजरी करण्यासाठी भाऊसाहेब जाधव,अतुल जाधव, किशोर जाधव,दिपक सिरसट, सतीश कांबळे,गुणवंत जाधव, सुजित जाधव,नितीन जाधव, ऋषी कांबळे,अक्षय सिरसट यांनी विशेष प्रयत्न घेतले. तसेच बबन शिनगारे, प्रकाश शिनगारे, बळीराम शिनगारे,श्रीकृष्ण शिनगारे,अक्षय गवळी,धम्मपाल गवळी,सुधीर शिनगारे,राजेंद्र काशीद,अतुल चौधरी,बाजीराव भराटे,महेश खोले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
जय भवानी विद्यालय,पारा परीक्षा केंद्राला भरारी पथकाची भेट;
माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेची नाळ;जय भवानी विद्यालयात प्रेरणादायी मार्गदर्शन व खाऊ वाटप
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना जय भवानी विद्यालयात अभिवादन