August 9, 2025

झिरो ड्रॉप आउट साठी जि.प.माळकरंजा शाळेची प्रभात फेरी

  • कळंब – तालुक्यातील मौजे माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेने दि.३१ जुलै २०२४ रोजी विद्यार्थी गळती रोखण्यासाठी पिरामल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये झिरो ड्रॉप आउट साठी प्रभात फेरीचे आयोजन केले होते. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, शाळेतील सर्व विद्यार्थी नियमित उपस्थित राहावेत,गावातील एकही विद्यार्थी शाळेशिवाय आणि शिक्षणाविना राहू नये, गुणवत्ता पुर्ण शिक्षणाबद्दल पालकांमध्ये आणि समस्त गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी पिरामल फाउंडेशनचे गणेश सिंह आणि विवेक कुमार यांच्या निरिक्षणात गावांमधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
    यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मुले शाळेत पाठवा,साक्षर जनता भुषण भारता यासारख्या घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली. बालकांना आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावे याबद्दल गावामधून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.या फेरी आयोजनासाठी शाळेचे शालेय मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातील सर्व सदस्य शालेय मुख्यमंत्री अंजली लोमटे , उपमुख्यमंत्री विराज शिंदे, तनुजा पुदंगे,यासह सर्वांनीच प्रयत्न केले. यावेळी त्यांना मुख्याध्यापक संतोष भोजने, सहशिक्षक हनुमंत घाडगे, सहशिक्षिका श्रीमती समीना बागवान आणि भारती सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.
error: Content is protected !!