कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग आणि संयुक्त विद्यमाने लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यावेळी डॉ.अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. अशोकराव मोहेकर ( सचिव, ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा ) यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापुरुषांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य यावर प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी (सांस्कृतिक विभागप्रमुख ) यांनी व्याख्यान दिले. यावेळी ते म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक डॉ. अण्णा भाऊ साठे यांची जयंती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शैक्षणिक,सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक,आर्थिक, शेतीविषयक आणि महिलाविषयक अशा सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.आयुष्यभर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि अस्पृश्य- बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी प्राणपणाने लढले. ते एक कृतिशील आणि प्रयोगशील राजे, समाजसुधारक, विचारवंत होते. आपल्या देशाला महापुरूषांच्या समृद्ध, परंपरा आणि विचारांचा वारसा भारतीय समाजाला सातत्याने नेहमीच दिशा देतात.” असे मत सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी मांडले. तसेच यावेळी प्रा.दीपक वाळके यांचे कॅश अंतर्गत पदोन्नती आणि प्रा. डॉ.दीपक सूर्यवंशी यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अनुदान प्राप्त – ” रंगनाथ तिवारी व्यक्ती आणि वाडमय ” ग्रंथाचा शासनमान्य प्रकाशित यादीत समावेश झाला, त्याबद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. महाजन,डॉ. आर. व्ही.ताटीपामुल,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव, उपसंपादक अरविंद शिंदे,प्रा.कारकर , प्रा.बोंदर सर , प्रा.नितीन अंकुशराव, डॉ. ईश्वर राठोड, डॉ.नामानंद साठे, प्रा.दादाराव गुंडरे, डॉ. पावडे , डॉ.मीनाक्षी जाधव,डॉ. पल्लवी उंद्रे, संचालक बी एस गव्हाणे, तात्या पाटील, सहाय्यक ग्रंथपाल श्री अरविंद शिंदे, नेताजी देशमुख, संतोष मोरे,आदित्य मडके, भारत शेळके आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दत्ता साकोळे यांनी सूत्रसंचलन तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.ईश्वर राठोड यांनी मानले.या कार्यक्रमासाठी आदित्य मडके आणि उमेश साळुंखे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले