August 8, 2025

हिंदी कथा सम्राट प्रेमचंद जयंती साजरी

कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे ३१ जुलै २०२४ रोजी हिंदी विभागामार्फत हिंदी साहित्याचे प्रसिध्द साहित्यकार प्रेमचंद यांच्या १४५ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. अशोक मोहेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.दत्ता साकोळे हे उपस्थित होते.
डॉ. दत्ता साकोळे यांनी प्रेमचंद यांच्या यांचे जीवन व साहित्य याविषयी सविस्तर विचार मांडले तसेच प्रेमचंद यांच्या साहित्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयातील प्रा. ईश्वर राठोड, प्रा.नामानंद साठे, प्रा. ताटीपामुल, प्रा.आदाटे, प्रा. मीनाक्षी जाधव, प्रा. अक्षयकुमार खंडागळे, प्रा.आडे, प्रा.शिंदे, प्रा. शाहरुख शेख, प्रा.बालासाहेब बाबर, प्रा.मारुती शिंपले तसेच सुजाता तेलंग,प्रांजली शिनगारे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!