दिनांक १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. महाराष्ट्राबरोबर भारताची नवी ओळख जगाला करून दिली आशा महान जगद्विख्यात क्रांतिकारी, अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याऱ्या अण्णाभाऊ च्या कार्याला सलाम… संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतःला झोकून देऊन मराठी भाषिकांचे भवितव्य पहाणारा साहित्य क्रांतिकारक नेता पुन्हा होणे नाही १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला. आणि स्वतंत्रच्या दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्याचा धिक्कार करीत *” ये आझादी झुटी है…देश की जनता भुकी है ” अशी* घोषणा देणारे देशाच्या चळवळ प्रखर मत मांडणारे अण्णाभाऊ साठे होते महाराष्ट्र च्या मातीत जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे यांचा पिंड अन्याय विरुद्ध आवाज उठविणारा साहित्यातून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर कामगार, दीन ,दलितांच्या प्रश्न मांडून शब्दांना पाझर फोडणॎारा होता. अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीतील व साहित्यातील नायक भले आर्थिक दृष्ट्या कमजोर असतील मात्र स्वतःच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते अन्यायाशी तडजोड करणारे करणारे नाहीत अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीची तलवार बनवली आणि लेखणीतून समाजाची व्यवस्था मांडण्याचे कार्य केले ०२ ऑगस्ट १९५८ रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापर भाषणात अण्णाभाऊंनी ही *” पृथ्वी शेषाच्या मस्तकावर ठरलेली नसून ती गोरगरीब कष्टकरी दिन दलितांच्या तळहातावर तरलेली आहे “* असा विज्ञानवादी विचार देशाला दिला व धर्म व्यवस्थेतील हजारो वर्षाच्या सिद्धांत कायमचा रद्दबातल ठरवून कष्टकरी दलितांना नवराष्ट्र निर्मितीचे उगमस्थान बनवले अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला जोडली जावी म्हणून महाराष्ट्रात़ील क्रांतीकारक, कामगार, कष्टकरी , शेतमजूर , गिरणी कामगारांना एकत्रित केले व संयुक्त महाराष्ट्रा व्हावा म्हणून राज्यभर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा केली. लोकशाहीतून समाज प्रबोधन करणारे युगपुरुष म्हणजे अण्णाभाऊ साठे होय. अण्णाभाऊ हे केवळ जनतेची कदर करणारे होते परंतु ते एक महान साहित्यिक लेखक, कवी, क्रांतिकारक कष्टकऱ्यांचे नेते होते. अन्यायाला गाढून टाकणारे होते .महाराष्ट्रच्या पवित्र मातीवर निष्ठा वाहणारा महान राष्ट्रभक्त अल्पशिक्षित कष्टकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांनी राष्ट्र मान्यता मिळवली अण्णाभाऊंनी जे भोगले ते पचवले आणि तेच आपल्या साहित्यात लिहिले मात्र आपली लेखणी कोणाच्या दावणीला न बांधता हलाकीचे जीवन जगत आपली अस्मिता कायम ठेवली, मुंबईच्या अस्तित्वासाठी लढा उभारून मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी अण्णाभाऊंचा सिंहाचा वाटा होता महाराष्ट्राची माती अण्णाभाऊ च्या कार्यला कशी विसरणार साहित्य कोणत्याही भाषेत लिहता येते साहित्य बरोबर साहित्यिक मोठा होतो परंतु माझी माणसं, प्रांत ,माझे राष्ट्र, माझी मातृभूमी साहित्यतुन मोठी व्हवी म्हणणारे अण्णाभाऊ साठे हे उत्तम उदाहरण होते त्यासाठी अण्णाभाऊ मराठी भाषेला पहिली पसंती देऊन साहित्य विश्वात मराठी भाषेचे अस्तित्वाचे भांडार उभारले आज अण्णाभाऊंचे साहित्य विविध भाषेत रूपांतरित आहेत काही साहित्य प्रबंधा साठी आहेत अण्णाभाऊंनी लिहलेल्या काही कादंबऱ्या त्यामध्ये फकीर , गुलाम , जिवंत काडतुस ‘ वारणेचा वाघ ‘ मास्तर , रानबोका, रुपा , धुंद, या सह बऱ्याच कादंबऱ्या पोवाडे याचा समावेश आहे हे साहित्य वेगवेगळ्या भाषेत रुपांतरीत आहेत मुंबई ही महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून संपूर्ण राज्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ करणाऱ्या थोर लढवय्या क्रांतिकारकास …सलाम
– सचिन क्षिरसागर *सामाजिक कार्यकर्ते कळंब जिल्हा धारशिव / उस्मानाबाद
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले