मानव मुक्तीच्या लढ्यातील अग्रगन्य शिवशाहीर, लोकशाहिर म्हणुन ज्यांची ख्याती रशियापर्यंत पोहचली ईतकेच काय तर घरात अठरा विश्व दारिद्र्य गरीबी असताना देखील ज्यांच्या कार्याची , कर्तुत्वाची ऊंची ईतकी मोठी होती की ज्यांच्या लेखणीने आणि शाहिरीने डॉ होमी भाभा, नर्गिस, बलराज साहनी असे कित्येक राष्ट्रीय दिग्गजांना प्रभावित करणारे सत्यशोधक शाहीर व लेखक म्हणुन ज्यांची ऐतिहासिक नोंद विश्वास पाटलांच्या कांदबरीत पहावयास मिळते.
तसं पाहिले तर १६ व्या शतकात एक तुकाराम जन्माला आले ज्यांनी या देशातील हजारो वर्षाच्या मानसिक गुलामीत जीवन जगणाऱ्या असंख्य माणसांना त्यांच्या नैतिक मूल्यांचा हक्क आणि आधिकार झगडुन मिळवावा लागतो म्हणुन स्वताचा वारकरी धर्म निर्माण केला जो धर्म मार्तंडांच्या विरोधात संस्कृत भाषेतील असंख्य रचना , ओवी, अनेक साहित्य ज्यांनी स्वताच्या कल्पकतेतुन आणि अनुभवातुन सर्वसामान्यांच्या हाताशी आणुन ठेवण्यासाठी मोठा संघर्ष केला तेही म्हणाले की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।१।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्द वाटू धन जनलोका ।।२।।
अर्थ –
आमच्या घरी शब्द हीच रत्ने आहेत. हे शब्द आमच्यासाठी शस्त्रे देखील आहेत. म्हणून त्या शस्त्रांचे आम्ही नीट जतन करू. ।।१।।
शब्द हेच आमच्या जीवाचे जीवन आहे. हेच शब्दरुपी धन आम्ही लोकांना वाटु !!२!!
याचांच वैचारिक वारसा पुढे चालविण्यासाठी वालुबाई आणि भाऊराव साठे यांनी आपल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले आणि हाच मुलगा ईंग्रजांच्या खजिनातुन फकिराच्या हातुन बाळगुटी पिऊन पुढे ईतका मोठा क्रांतिकारी लेखक, साहित्यीक, ईतकेच काय तर विख्यात शिवशाहीर , लोकशाहीर होईल सोडाच परंतु भारताचे मॅग्झिन गॉर्की म्हणुन ज्यांचा गौरव केला जातो तो केवळ त्यांच्या कर्तुत्वानेच अन्यथा ज्यांना व्यवस्थेने नाकरून ज्यांना माणुस म्हणुन देखील जगण्याचा आधिकार नाकारला गेला अशा थोर साहित्याच्या कोहिनुरांची ही विलक्षण प्रतिभाही काही औरच आहे .
खरंतर अण्णाभाऊ साठे म्हणजे….
शोषित, पिढीत, दबलेल्या , दाबलेल्या, असंख्य लोकांच्या वेदनेचा ऊद्गगार अन् माणुसपणाचे जीनं नाकारलेल्या , पिळवणुक झालेल्या स्त्रियांच्या आक्रोशाचा हुकांर……
जीवनभर व्यवस्थेने निर्माण केलेले काटे, निखारे पायदळी तुडवत शोषितांच्या, आणि पिढीतांच्या जागृतीची मशाल पेटवणारे क्रांतीचे अग्रगण्य लेखक ……..
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालविण्यासाठी , मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच यासाठी माझी मैना ही छक्कड गात, यह आझादी झुठी है, हा नारा देत दिल्लीपर्यंत धडक मारणारे साहित्यसम्राट……..
तर मग अण्णाभाऊच्या लेखणीला लहुजीबाबांच्या तलवारीची धार होती, शाहु महाराजांच्या मानवक्रांतीच्या चळवळीची वारसदार होती , तर क्रांतिबा महात्मा जोतिराव फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीची मशाल होती ईतकेच काय तर विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीची आग होती…..
अण्णाभाऊ च्या लेखनाला समाजाच्या कष्टकरी थरामध्ये उदंड वाचक वर्ग मिळाला मात्र हे हयात असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतर गेल्या पन्नास वर्षातही मराठी समीक्षेने त्यांना उपेक्ष्याच्या काटेरी कुंपणा बाहेर ठेवले आहे खरे तर हा मराठीतला श्रेष्ठ लेखक गेले शतकात सहाव्या आणि सातव्या दशकात जर्मन पोलीस रशियन आदी जागतिक भाषा मध्ये भाषांतरित झाला होता त्यांची माकडीचा माळ या नावाची भारतीय साहित्यात भटक्या आणि फिरस्त्या वर्गाचे धगधगते काटेरी जग ताकतीने मांडणारी पहिली कादंबरी ती जशी भेदक आहे तशीच ती वाङमयीन दृष्ट्या अभिजात आहे मुंबईच्या झोपडपट्टीतील पत्र्याच्या चाळीपासून ते रानातल्या निवडुंगाच्या बनापर्यंतचे स्त्री जीवनाचे जे काटेरी दुःख आणि दुर्दैवी भोग ज्या कळवळ्याने अण्णाभाऊंनी चितारले आहेत त्याला भारतीय साहित्यात तोड नाही.
जगातल्या बहुतांशी थोर लेखकात आणि विशेषता कादंबरी कारांमध्ये एक समान गुणधर्म किंवा एक समान सूत्र आढळून येते. जीवनाचा पल्ला आणि आवाका कवीत घेण्यासाठी की काय त्यांनी जीवन जगताना भटक्या, फिरस्त्याचा धर्म स्वीकारलेला असतो मग ही भटकंती जाणीवपूर्वक किंवा अजाणताही होत राहते आणि अण्णाभाऊंनी सुद्धा हा भटकंतीचा धर्म कसोशीने पाळला होता म्हणून एका ठिकाणी आण्णाभाऊ 1962 मध्ये शिवाजी कॉलेज सातारा येथे मी आणि माझे साहित्य या विषयावर बोलताना अण्णाभाऊ म्हणाले होते मी जातीने मांग आहे त्यामुळे माझ्याकडे जीवनानुभवाचा भरपूर वाक आहे या सामग्रीच्या आधारे संघर्षाचा करकचून पिळ भरून मी माझ्या अनुभवाचा कसदार धूळ वळत असतो त्यामुळे मी जे पाहिलं अनुभवलं तेच मी माझ्या साहित्यात लिहीत असतो माझ्या साहित्यातील नायक हे वास्तव जगातले असतात सत्याचा आधार माझ्या साहित्याच्या घटना प्रसंगांना असतो मी स्वर्ग नरकाचं भूतकाळातलं पुराणातलं काही लिहिलं नाही जे लिहितो ते वास्तव वर्तमानातलं दैनंदिन जीवनातलं असतं तुमच्या माझ्या जीवना अनुभवाचे मी लिहित असतो माझ्या साहित्यातील संघर्षाचा टणक दूर चिवट असतो जो सहसा तुटत नाही चुकून कुठे तुटलास तर मी त्याला चिलबिलतो मग त्याची पुन्हा तुटण्याची शक्यता अजिबात राहत नाही,
अण्णाभाऊंचे आपल्या परिसरात उच्चभ्रू वर्गाकडून कधी कौतुक झाले नाही कधीही त्यांच्या गळ्यात गौरवाचा हारही पडला नाही मीच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दिवसात कालेगावात गेलो होतो आमच्या गावामार्फत तिथल्या प्रचंड सभेत अण्णांच्या गळ्यात कौतुकाची माळ घातली होती असे वाटेगाव चे 92 वर्षाचे स्वातंत्र सैनिक बाबासाहेब पाटील तथा बाबाभाऊहो मला सांगत होते मला गौरव मोठेपणा मुळीच नको आहे त्यासाठी लिहीतच नाही मी माझ्या काळजाला घर पडलीत ती छिद्र बुजवण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखणीने करतोय माझ्या अंतकरणाची तळमळ कोणालाच कळत नाही अशी प्रांजळ कबुली देत हा अण्णाभाऊ नावाचा दृष्टा शब्दकार लिहिता राहिला त्यांचे लेखन लेखीभाळींच्या दुकाने गलबदून गेलेले आहे आम्ही पुरोगामी व उच्चविद्या कुलीन साहित्यिक गावकुसाबाहेरची घायपाताची काटेरी बने ओलांडून त्या उपाशी वस्त्यांमधून कधी फिरलो नाही दलितांचे दुःख एखाद्या बन्सीधराच्या पलीकडे जाऊन कधी समजून घेतली नाहीत पण हा अण्णाभाऊ सारखा त्या काटेरी वंचित विश्वातला एक लेखक उडतो आणि मराठी साहित्याला नव्हे तर विश्व साहित्यालाच जागल्या बनवून बहुजन समाजातल्या तसेच सरंजामी महालातल्या सुरडल्या गेलेल्या आणि भरडल्या गेलेल्या स्त्रियांची दुर्दैवी लेखीबाळींची अशी विराट दुःख गंगा सादर करतो हे घटनाच मोठी विस्मयकारक आणि तितकीच धवलही आहे.
अण्णांच्या कथा आणि कादंबऱ्यातले चोरी दरोडे करणारे नायक हे पोटाच्या लढाईसाठी धडपडताना दिसतात त्यांचे बंड गरीब बाया बापड्यांचे संरक्षण करण्यासाठी किंवा सामान्य शेतकऱ्यांच्या पिकावरून फिरणाऱ्या गाढवाचा नांगर रोखण्यासाठी होते ही गोष्ट अनेकदा अधोरेखित झालेली आहे विठू महार ही कथा आंबेडकरांच्या धर्मांतराच्या आधी सुमारे दोन वर्ष युगांतर मध्ये प्रसिद्ध झाली होती. नव्या बंद मुक्त भारतात समाज रचना कशी राहणार आहे ती जाती धर्माच्या अजगराच्या जबड्यात तशीच अडकून राहणार किती नव्या मुक्तीचा ध्यास घेणार हा बिनीचा प्रश्न या कथेने उभा केला आहे त्याची पार्श्वभूमी मराठवाड्याकडची रजा कराच्या आंदोलनावेळी आहे विठू महार मधील गावचा हसन पाटील नावाचा पाटील तीन बायका आणि 12 15 पोरांचा पोवाडा सांभाळणारा असतो तो तेव्हाच्या हैदराबादच्या जुलमी संस्थानिकाचे रजा कराचे मीठ खाणार आहे ग्रामसभेत समोर गावकरी आणि बाजूच्या झाडाखाली पलीकडे महार मंडळी बसलेली असतात गावापरावरची मारुतीची मोठी पाषाण मूर्ती खांद्यावर गदा घेतलेली आणि आभाळाच्या दिशेने उडान करणारी आहे अशी लढाऊ मूर्ती यापुढे चालणार नाही तुम्ही एखादी नम्र दास मारुतीची मूर्ती घडवा असा हुकूम हसन पाटील सोडतो हसन महाराणा मंदिरात बोलावतो बाकीच्या गावकरी त्या कृत्याला कडाडून विरोध करतात मग हसन महार समाजातील बांधवाकडे चालत जातो तेव्हा त्याला विठू माराच्या पायात नवा कोरा जोडा दिसतो विटने आपल्या पायात घातलेला तो नवा कोरा जोडा काढून बाजूला ठेवायची तो सक्ती करतो नवे चांगले चांगले अंगावर परिधान करायचा आज पुरुषांना अधिकारच नाही असे तो सर्वांच्या मनावर बंबवतो. विठूचे मस्त गरगर ते आपल्या घरी जाऊन हंबर्डा फोडून रडत राहतो त्या घोर जाहीर अपमानामुळे रात्रींना महारवाड्यात एकही चूल पेटली नदीला लागला पुढे जुलमी रजाकार संपला आपला जनाना घेऊन हसन पाटील गाव सोडून पळून गेला गावच्या पाटलाची जागा रिकामी झाली गावच्या पाटीलकीसाठी विटूने तालुक्याला जाऊन अर्ज दिला महार पाटील बनून चावडीत बसणार ह्या कल्पनेने गाव उलते पालते झाले महाराला पाटील होऊ द्यायचे नाही असा सर्वजण कला करतात तेव्हा नाथा लोहार उठून पंढरीच्या विठोबाचा संदर्भ देत गर्जतो जर देवाचा महार झाला आहे तर महाराज पाटील का नको विठू मोठ्या जिद्दीने पाटील तिची सनद मिळवतो ते घेऊन वाजत गाजत घराकडे परतून येतो नवा जोडा घालून नवा कारभार चालवण्यासाठी चावडीकडे निघतो या कथेत अन्न तत्कालीन जाती व्यवस्थेची विषारी उतरण दाखवून देतातच पण कोणाच्या दबावाला बळी न पडता आज पुरुषांनी ताण मान ताठ करून जगलेच पाहिजे जिथे आपण ब्रिटिशांशी आणि रजाकरांशीही झुंजलो तिथे गावगुंडासमोर का दबायचे अशी बाणेदार पणाची शिकवण देतात पण अण्णांची ही विठू महाराजांसारखी अवलकता त्यांच्या हयातीत आणि नंतर गेल्या पन्नास वर्षातही गांभीर्याने कधी वाचली गेली नाही हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे.
अण्णाभाऊ आजच्या व्यवस्थेवर आपली लेखणी चालवत लिहितात
ईथली न्यायव्यवस्था कैकांची रखेल झाली, ईथली संसद देखील हिझड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा कुणापुढे मांडू, कारण ईथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन झाली…..
अण्णाभाऊंची चळवळ ही केवळ एका जाती, धर्मापुरती मर्यादित नसुन या देशातील असंख्या शोषित , पिढीत, वंचितांच्या न्याय, हक्क, समता, स्वातंत्र्याबरोबरच बंधुभाव निर्माण करणारी होती….
म्हणुन कवी लिहितो
अण्णा, तुम्ही वर्णवाद्यांची, आणि वर्गवाद्यांची चामडी सोलुन आपली डफ मडवली, शाळेची पायरीही न चढता तुम्ही अनेक विद्यापीठे घडवलीत….
अण्णा तुम्ही गात होतात, लिहित होतात माणसांचे दुख: आणि आसवांच्या कथा, महालांच्या मुकाबल्यात झोपड्यांची व्यथा, तुमचं गाणं साऱ्या जगाने ऐकलं पण कुणीही तुम्हाला पोटाशी नाही धरलं, बरं केलतं अण्णा, शेवटी तुम्ही आपली नाळ निळाईशी जोडलात आणि म्हणालांत
“जगं बदल घालुनी घावं सागुंनी गेले मज भीमराव “
अण्णाभाऊनी आपल्या आयुष्याला संघर्षाच्या भट्टीतुन भाजून घेतले तेंव्हा कुठे बुध्दाची शपथ नावाची कथा लिहिली , जगाला बदलण्याची शक्ती ही एकजुठीत आहे तो संदेश महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सांगितला आहे त्यामुळे आपण न्याय, समता, स्वातंत्र, बंधुता यावर आधारित नवा , समाज, नवे राष्ट्र, नवा देश निर्माण करण्यासाठी तमाम मानवजातीने हा क्रांतीचा विचार मनामनातुन पेरत क्रांतीचे समतेचे पीक निर्माण केले पाहिजे हा संदेश साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देवुन सर्वांना जयंतीच्या लक्ष लक्ष मंगलकामना….
लेखक: ✍🏻🎤✊🏻 प्रा.एम.एम.सुरनर सर प्रबोधनाचा बुलंद आवाज 8482825582
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन