ठाणे – आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य आणि पोषण सारख्या मुलभुत सुविधा देण्याबाबत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.ठाणे जिल्ह्यात अदिवासी व अतिदुर्गम भागात १० मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचारी यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. १ मोबाईल मेडिकल युनिट मुरबाड व शहापूर तालु्क्यात सुरू असून, ०९ मोबाईल मेडिकल युनिट १ ऑगस्टपासून जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी काम करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील व प्रामाणिकपणे कामकाज करावे असे मार्गदर्शन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. “मोबाईल मेडिकल युनिट” उपक्रमातंर्गत ठाणे जिल्ह्यात ८१ दुर्गम अणि अतिदुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १० मोबाईल मेडिकल युनिट ग्रामीण भागात तयार करण्यात आले आहेत. यासाठी वैद्यकीय अधिकारी १०, जीएनएम ८, लॅब टेक्नीशियन १० व र्फोमासिस्ट १० असे एकूण ३८ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश आज देण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्पाअंतर्गत मुरबाड तालुक्यात ३, शहापुर तालुक्यात ३, भिवंडी तालुक्यात २, अंबरनाथ तालुक्यात १ व कल्याण तालुक्यात १ असे एकूण १० मोबाईल मेडिकल युनिट सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक मोबाईल मेडिकल युनिटसाठी वैद्यकीय अधिकारी,जीएनएम, लॅब टेक्नीशियन व र्फोमासिस्ट असे एकूण ४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
More Stories
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt Memory तपासणी प्रक्रिया पूर्ण
ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो! मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात
जिल्हा परिषद ठाणे येथे महाराष्ट्र दिन साजरा