बदलापूर ( तात्यासाहेब सोनवणे) – तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचे आचरण,आष्टांगिक मार्ग आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचे पालन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यांची मुलं चार भिंतीच्या आतच सुसंस्कृत घडत असतात असे प्रतिपादन बौद्धाचार्य नामदेव जिने यांनी गृहप्रवेश बुद्ध पूजा प्रसंगी धम्मदेशनेतून केले. बदलापूर ठाणे येथील पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस नायक जयश्री काशिनाथ ढोकणे यांच्या भवानी लाईटस, शिरगाव,बदलापूर (पू) येथील टू बीएचके फ्लॅटचा गृहप्रवेश ज्येष्ठ नागरिक तथा पो.ना.जयश्री यांचे वडील बाबुराव दशरथ घोडके यांच्या हस्ते दिनांक २९ जुलै २०२४ रोजी दुपारी दोन वाजता रिबीन कापून मोठ्या थाटात संपन्न झाला. याप्रसंगी साक्षी पावन ज्योत संपादक सुभाष घोडके,स.पो.नि कल्याण ढोकणे, समाज भूषण तात्यासाहेब सोनवणे, कार्यकारी अभियंता गोपीचंद घोडके,दीपांशु घोडके, शशांक घोडके,अँड.श्वेता ढोकणे. अँड.निलेश ढोकणे,पो.नि.प्रवीण अमृतकर आदींनी मनोगतपर शुभेच्छा व्यक्त केल्या.
More Stories
उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश;अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड
प्रेरणा फाउंडेशनचा मोफत आरोग्य शिबीर व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा धुमधडाक्यात साजरा
जिंदादिली का दुसरा नाम, जालिंदर सावंत साहेब!