२१ डिसेंबरला होणार मतमोजणी
ठाणे (जिमाका) – राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणि दि.०३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी नियोजित होती.परंतु मा.मुंबई उच्च न्यायालय,नागपूर खंडपीठ येथे दाखल झालेल्या रिट याचिकेच्या सुनावणीत देण्यात आलेल्या निर्णयानुसार दि.०३ डिसेंबर २०२५ रोजी होणारी मतमोजणी ही आता दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी करावी व तसा निकाल घोषित करावा,असे न्यायालयाचे आदेश आहेत.
तसेच न्यायालयीन अपील दाखल झाल्याने बाधित झालेल्या नगरपरिषदा/नगरपंचायतींकरिता मतदान दि.२० डिसेंबर २०२५ रोजी तर मतमोजणी दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर सुनावणीदरम्यान २ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकांच्या वेळापत्रकात सुधारणा करण्याचे आदेश दिले. याआधी आयोगाने २ आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया निश्चित केली होती.मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे संपूर्ण कार्यक्रमात सुधारणा करण्यात आली आहे.
संबंधित सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी यांना नव्या तारखेनुसार तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
More Stories
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt Memory तपासणी प्रक्रिया पूर्ण
ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो! मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात
जिल्हा परिषद ठाणे येथे महाराष्ट्र दिन साजरा