बीड – मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात केज तालुक्यातील गोटेगाव येथील शेतमजुराचा मुलगा,अत्यंत गरिबीची हालाखीच्या परिस्थितीमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्राच्या प्रेरणेतून शिक्षण घेऊन वकील बनण्याची जिद्द मनामध्ये बाळगून गोटेगावचे सुपुत्र अँड. तुषार छत्रभुज बचुटे याने कष्ट करून शिक्षण घेत एलएलबी ही पदवी मिळविली आहे. ठाणे! जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी इंद्रापाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालय या महाविद्यालयात चिकाटीने व जिद्दीने शिक्षण घेत गगनाला गवसणी घातली आहे. प्राचार्य अँड.गायत्री पाटील यांनी तुषार यांचे कौतुक केले आहे. शिक्षण घेत असताना तुषारला बऱ्याच अडचणी आल्या त्याने जिद्द सोडली नाही. त्यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय, अक्षय गोटेगावकर, प्रीतम बचुटे, शुभम बचुटे , दीपक बचुटे यांचे तुषारला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. गोटेगावचे सर्व ग्रामस्थ, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनीही तुषारचे अभिनंदन, कौतुक केले आहे. गोरगरीब वंचित नागरिकांना न्याय मिळावा तसेच भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार करून गरीब मुलांना शिक्षणामध्ये मदत करणार असल्याचे अँड. तुषार छत्रभूज बचुटे यांनी सांगितले.
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन