- धाराशिव (जिमाका) – राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या एमएसएमई (MSME) क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे,एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम (ODOP) आणि निर्यात वृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरिता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबविण्यात येत आहे.
सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याकरिता संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने IGNITE MAHARASHTRA-2024 या अंतर्गत जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा 26 जुलै 2024 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, धाराशिव येथे सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
- या चर्चासत्राचे नियोजन विकास आयुक्त (उद्योग) यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली व छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग सहसंचालक बी.टी.यशवंते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या एक दिवसीय कार्यशाळेसाठी सुक्ष्म,लघु,मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार,निर्यातक्षम उद्योजक,
नवउद्योजक,औद्योगिक संस्था व संघटना,औद्योगिक समूह,शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक,प्रक्रिया उत्पादक,केंद्र आणि राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य,निर्यातसंबंधी कामकाज करणारे घटक,संशोधक,बँका इत्यादींना आमंत्रित करण्यात आले आहे.या कार्यशाळेचा सर्व भागधारकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान