March 26, 2026

उमरगा येथे 15 जुलै रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

  • धाराशिव (जिमाका) – रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार/नोकरी इच्छुक उमेदवारांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात येते.
    याचाच एक भाग म्हणून सोमवार,15 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाअंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र,उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी जागतिक कौशल्य दिनाच्या निमीत्ताने “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील नामांकित 34 उद्योजक/ कंपनी / आस्थापना / कारखान्याचे प्रतिनिधी सहभागी होणार असून ते 531 पदासाठी उमेदवारांची निवड करणार आहेत.
    या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्र व नोकरी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जॉब सिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) करुन वैयक्तिक माहिती,शैक्षणिक पात्रतेचा तपशील,आधार क्रमांक, मोबाईल, ई-मेल,पत्ता अद्यावत करावा. त्यानंतर रोजगार मेळाव्यात ऑनलाईन नोंदणी करावी.
    तरी या पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02472-299434 वर संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.
error: Content is protected !!