- धाराशिव (जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील कार्यरत शासकीय मुलां-मुलींचे शासकीय वसतीगृहातील रिक्त जागेसाठी सन 2024-25 या वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. शासकीय वसतीगृहाचे सन 2024-25 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 10 जुलैपर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा आहे.12 जुलै रोजी पहिली निवड यादी अंतिम व प्रसिध्द केली जाणार आहे.पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 18 जुलै 2024 पर्यंत आहे.रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार 19 जुलै रोजी निवड यादी प्रसिध्द केली जाईल.दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 24 जुलै रोजी प्रवेश दिला जाणार आहे.इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशासाठी 31 जुलै 2024 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
- 5 ऑगस्ट रोजी पहिली निवड यादी अंतिम व प्रसिध्द केली जाणार आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12 ऑगस्ट 2024 आहे.रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार 15 ऑगस्ट रोजी निवड यादी प्रसिध्द केली जाईल.दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट रोजी प्रवेश दिला जाणार आहे.बीए/बी.कॉम/बी.एस.सी.अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम./एम.एस.सी.असे पदवीनंतरचे पदव्युत्तर,पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
- 5 ऑगस्ट रोजी पहिली निवड यादी अंतिम व प्रसिध्द केली जाणार आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत ही 12 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार 15 ऑगस्ट रोजी निवड यादी प्रसिध्द केली जाईल.दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट 2024 रोजी प्रवेश दिला जाणार आहे.
- व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शासकीय वसतीगृहे प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येणार आहे.प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिल्यास मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारता येतील व प्राप्त अर्जानुसार यादी प्रसिध्द करण्यात येईल.
जिल्ह्यातील धाराशिव,जुने धाराशिव तसेच तुळजापूर,नळदुर्ग, कळंब,परंडा व लोहारा येथील मुलांचे वसतीगृहे आणि तुळजापूर,उमरगा, वाशी,नवीन धाराशिव येथील कार्यरत मुलींचे शासकीय वसतीगृहे सन 2024-25 वर्षाकरीता रिक्त असलेल्या इयत्ता 8 वी ते 10 वी च्या 178 जागा रिक्त आहे.इयत्ता 11 वी, 12 वी नंतरच्या प्रवेशितांच्या 54 रिक्त जागा आहेत. - उच्च शिक्षण घेणारे बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या 56 जागा,उच्च शिक्षण घेणारे व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या 68 जागा अशा एकूण 356 सर्वसाधारण रिक्त जागा आहेत.खास बाब म्हणून 61 रिक्त जागा आहेत.
शासन निर्णयाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार रिक्त जागा भरण्यात येतील. विद्यार्थ्यांनी संबंधित वसतीगृहाचे गृहपाल यांच्याकडून अर्ज प्राप्त करुन घेवून परीपूर्ण अर्ज ऑफलाईन पध्दतीने गृहपाल यांच्याकडे जमा करावा.सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशित विहीत मुदतीत निश्चित करावा,असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला