धाराशिव – अनुरथजी राजाराम नागटिळक,केन्द्रप्रमुख उपळा ( मा) यांचा हरिभाऊ घोगरे हायस्कूल उपळा येथे दि.३० जून २०२४ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू पडवळ, प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी प्रकाशजी पारवे,जगदीश जकाते, बशीर तांबोळी,केन्द्रीय मुख्याध्यापक राठोड शेषेराव, देशमुख मॅडम, रामगुडे मॅडम, क्षीरसागर, बाळासाहेब शिंदे, श्रीपती जमाले , सुनील चव्हाण, क्रांन्ती मते कार्यक्रमासाठी उपस्थित होते. प्रकाशजी पारवे साहेबांनी नागटिळक साहेबा बदल माहीती दिली. योग व प्राणायाम यांची आवड असणारे, हजरजबाबी व्यक्तीमत्व असणारे, दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे, कायद्याची पदवी प्राप्त करणारे. खांमकर यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले, त्यांची ३७ वर्ष सेवा शिक्षक व केंन्द्रप्रमुख म्हणून ढाण्या वाघासारखी झाली आहे. त्यांची गोड बोलून काम करून घेण्याची पद्धत अदभूत होती. बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले, जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा, या उक्ती प्रमाणे त्यांनी कार्य केले, त्यांचे फळ म्हणून, संत तुकाराम महाराज यांच्या ओवी प्रमाणे शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, त्यांची चार ही मुले उच्च शिक्षीत आहेत व दोन जावई उच्च पदावर कार्यरत आहेत. नागटिळक यांनी विचार मांडले, अत्यंत गरीब व ग्रामीण भागातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले , सावित्री फुले यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून शिक्षण घेतले. पत्नीला सुद्धा शिक्षीत केले. याप्रसंगी आदर्श आश्रम शाळे तर्फे मुख्याध्यापक खंडू रंगनाथ पडवळ, पर्यवेक्षक अब्बास अली शेख, सतीश कुंभार यांच्या हस्ते अनुरथजी राजाराम नागटिळक साहेबांचा हार, पुष्पगुच्छ , बुके व छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवराज्य अभिषेक प्रतिमा देवून त्यांचा यशोचित सत्कार केला.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला