धाराशिव (जिमाका) – आदिवासी विकास विभागामार्फत आयुक्त,महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या स्तरावरून 23 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी विकास विभागातील 602 विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 23 नोव्हेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.विविध पदांकरिता उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत. सन 2024 चा महाराष्ट्र अधिनियम 26 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणे करण्यात येणार आहे. त्यानुसार पुनश्च बिंदू नामावली अद्ययावत करून गट- क संवर्गासाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासनस्तरावर सूचना देण्यात आलेल्या आहेत. आदिवासी विकास विभागाची 23 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेली जाहिरात तूर्तास स्थगित करण्यात येत आहे.याची सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनःश्च बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे.ही बिंदूनामावली अद्ययावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तरपणे कळविण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.असे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी कळविले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला