August 8, 2025

मोहेकर उद्योग समूहाचे हनुमंत मडके यांचा यशस्वी उद्योजक म्हणून सन्मान

  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारे कळंब तालुक्यातील मोहा येथील मोहेकर उद्योग समूहाचे सर्वे सर्वा तथा समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके यांचा दि.२६.०६.२०२४ रोजी सकाळ ऍग्रोवन तर्फे पुणे येथे पंचतारांकित हॉटेल शेरेटोन ग्रँड हॉटेल मध्ये आयोजित आयकॉनिक बॅण्ड इन ऍग्रीकल्चर कॉफी टेबल बुक या दिमाखदार प्रकाशन सोहळ्यामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर त्यांनी उद्योगमध्ये केलेल्या अतुलनीय प्रगतीचा सन्मान करत त्यांचे व त्यांनी केलेल्या यशस्वी उद्योगाला कॉफी टेबल बुकमध्ये स्थान देण्यात आले.
  • व्यवसाय किंवा उद्योजकता याला काही वयाची अथवा भरपूर मनुष्यबाळाची आवश्यकता नसते.आवश्यकता असते ती प्रचंड मेहनत,प्रबळ इच्छाशक्ती, व अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर ध्येय गाठण्याचे ते स्वप्न साकार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या मोहाचे सुपुत्र व उद्योगरत्न हनुमंत मडके यांनी सेवेच्या निवृत्ती नंतर धाडसाने एका नवीन व्यवसायाला सुरुवात करुन यशस्वीतेचे सर्व रेकॉर्ड पार केले. त्यांनी सुरु केलेले उद्योग, त्यासाठी केलेली मेहनत याची दखल घेत आयकॉनिक बॅण्ड इन ऍग्रीकल्चर कॉफी टेबल बुक मध्ये मोठ्या आदराने व सन्मानाने त्यांचा सामावेश केला गेला. यामध्ये यशस्वी उद्योजक, अतुलनीय कार्य व आदर्शवत कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सामावेश केला जातो. या कॉफी बुक मध्ये मोहासारख्या खेड्यातून हनुमंत (तात्या) मडके यांची निवड होणे हे मोहासाठी अभिमानाची व स्वाभिमानाची बाब आहे.
  • पुणे येथील हॉटेल शेरेटोन या पंचतारंकित हॉटेल मध्ये हा सोहळा पार पडला. दिमाखदार प्रकाशन सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील १८ यशस्वी उद्योजकांचे सन्मान करण्यात आले.
  •   
  • या १८ उद्योजकांमध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून मोहेकर उद्योग समूह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके यांचा सन्मान साखर आयुक्त शेखरजी गायकवाड, महाराष्ट्र राज्य बँक प्रशासक डॉ.विद्याधर अनासकर, सकाळ अँग्रोवन चे संपादक आदिनाथ चव्हाण तसेच सकाळ ऍग्रोवन चे सीईओ उदय जाधव यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. प्रकाशन करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुक या पुस्तकामध्ये तात्यांनी केलेले विविध विविध कार्य प्रकाशित करण्यात आले आहेत.

 

error: Content is protected !!