मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील मोहा येथे मोहेकर उद्योग समूहाकडून दि.२५ जून २०२४ रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथील दहावी व बारावी तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील विविध परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या एकूण ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, मोहेकर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत दिगंबर मडके यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहेकर उद्योग समूहाकडून जरवर्षी गुणवंताचा गुणगौरव केला जातो विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत मोहेकर समूहाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सर्वश्री गौतम मडके,प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर,ज्ञान प्रसारक मंडळाचे संचालक तात्यासाहेब पाटील,माजी सरपंच बाबासाहेब मडके,माजी उपसरपंच सोमनाथ मडके,उपसरपंच बशारत मोमीन ,मोहेकर उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके,प्रा.श्रीहरी बळीराम बोबडे,पोलीस पाटील प्रकाश गोरे,विविध का. सेवा सहकारी सोसायटीचे संचालक हनुमंत मडके,सामाजिक कार्यकर्ते अशोक मडके,व्यवस्थापक फुलचंद मडके,ग्रामसेवक हनुमंत झांबरे,मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप,डॉ.नितीन माने इत्यादी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ. प भारत जोशी यांनी केले तर आभार सतीश मडके यांनी मानले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश