February 9, 2026

अनुसूचित जातीच्या नवउद्योजकांनी स्टँड अप इंडियाचा लाभ घ्यावा

  • धाराशिव (जिमाका)- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उद्योजकासाठी स्टॅन्ड अप इंडीया योजना सुरु केली आहे.
    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जिल्हयातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील 18 वर्षावरील नवउद्योजकांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बॅंकेने अर्जदारास स्टॅन्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रॉन्ट एन्ड सबसिडी 15 टक्के राज्य शासन देणार आहे.
    तरी पात्र इच्छूक नवउद्योजकांनी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव या कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
error: Content is protected !!