लातूर (दिलीप आदमाने ) – इ. स. सन ६ जून सोळाशे १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पारतंत्र्यातली जनता किंवा राज्य हे स्वातंत्र्यात आणले आणि त्याचा रायगडावर स्वतः राज्याभिषेक केला त्यांनी संपूर्ण राज्यकारभारामध्ये जनतेच्या स्वराज्य हितासाठी धर्मनिरपेक्ष आणि विज्ञानवादी धोरणाचा अवलंब केला आणि त्यामुळेच स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात झाले असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख तथा इतिहास अभ्यासक डॉ. सदाशिव दंदे यांनी बोलताना व्यक्त केले. श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूर द्वारा संचलित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय इतिहास विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा प्राचार्य कक्षामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, प्रा. काशिनाथ पवार आणि प्रा. केशव बिरादार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.सदाशिव दंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्यकारभार करीत असताना अठरापगड जातीला एकत्र करून स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात केले आणि केवळ समाज हीत जोपासुनच संपूर्ण आयुष्यभर त्यांनी समाजासाठी कार्य केले. त्यांच्या राज्यकारभाराचा आदर्श आजचे राज्यकर्ते आणि प्रशासकांनी घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नामदेव बेंदरगे यांनी केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न होत आहे. या रायगडावर आपल्या लातूर येथील कलाधिराज ढोलपथकाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यक्तिगत स्वार्थापेक्षा समाजहित आणि सामाजिकता संपूर्ण आयुष्यामध्ये जतन केली. आपल्या कृतीशील व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या राजकारभाराचा आपल्याला आदर्श दिसून येतो. त्यांनी दिलेल्या विचाराची प्रत्यक्ष कृती व्यवहारात व्हावी असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला विनायक लोमटे, रत्नेश्वर स्वामी, विरसन उटगे, यशपाल ढोरमारे, महादेव स्वामी, योगेश मोदी, अनिल उस्तुरगे, शुभम बिराजदार, श्रीशैल्य पाटील, राम पाटील, योगीराज माकने, आनंद खोपे आणि अशोक शिंदे यांची उपस्थिती होती.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे