धाराशिव (जिमाका) – “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम” हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे.या योजनेतून सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनातर्फे अर्थसहाय्य करण्यात येते.उत्पादन उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 20 लाखापर्यंत कर्ज मर्यादा आहे.या योजनेअंतर्गत पुरुषांसाठी 15 टक्के ते 25 टक्केपर्यंत व महिलांसाठी 25 टक्के ते 35 टक्केपर्यंत अनुदानाची मर्यादा आहे. सन 2024-25 साठी जिल्हा उद्योग केंद्रास 800 कर्ज प्रस्तावांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.तरी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://maha-cmegp.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी. जिल्ह्यातील सर्व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, धाराशिव येथे संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
More Stories
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ
ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन