मंगरूळ – कळंब तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे दि.६ जून २०२४ रोजी रयतेचे राजा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा ग्रामपंचायतच्या वतीने साजरा करण्यात आला. प्रथम रयतेचे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या सोहळा कार्यक्रमाला सरपंच सौ.केवळबाई नारायण शिंदे, ग्रामविकास अधिकारी बी.बी.सोनवणे, तलाठी डी. व्ही.सिरसेवाड पाटील , वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन भागचंद बागरेचा,वि.वि.का. सोसायटीचे अधिकृत पंच मधुकरराव कांबळे, ग्रा.प.सदस्य हनुमंत रितापुरे, अनिल जाधव,गोवर्धन निंबाळकर,महादेव कांबळे, शहाजी कांबळे,गणेश रितापुरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
“कामगार चळवळीचा कणखर आधारवड हरपला” — अच्युतराव माने पाटील यांचे निधन
व्यावसायिक गणेश घेवारे यांना मातृशोक
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज