August 9, 2025

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे नीट परिक्षा २०२४ मध्ये घवघवीत यश

लातूर – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाने नीट २०२४ परीक्षेमध्ये याही वर्षी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत महाविद्यालयातील सोळंके तन्वी हंसराज हिने 720 पैकी 670 गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावला तसेच शेख सोहेल अब्दुल गणी यांनी 578 गुण घेऊन महाविद्यालयातून दुसरा क्रमांक पटकावला तसेच माळी सुशांत हनुमंत यांनी 575 गुण घेऊन तृतीय येण्याचा मान पटकावला तसेच नोकजा विजय अनिल कुमार 503 गुण, जोशी दिशा दिनेश 453 गुण, शेख सुजान बशीर 418 गुण व जोद्राने श्रद्धा सिद्धेश्वर 405 गुण घेऊन अनुक्रमे चौथा, पाचवा, सहावा व सातवा मान येण्याचा महाविद्यालयामध्ये पटकावला. तसेच महाविद्यालयातील डॉ. रत्नाकर बेडगे यांची कन्या रेणुका रत्नाकर बेडगे हिने 625 गुण, डॉ. भास्कर नल्ला रेड्डी यांची कन्या मेधा भास्कर रेड्डी हिने 440 गुण प्राप्त केले.
या सर्व गुणवंत व गुणवान विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पेढे देवून सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, बोर्ड समन्वयक प्रा. व्ही.सी.पाटील, प्रा.एस.एम.पाटील, प्रा.डॉ.गुणवंत बिरादार, प्रा.के.आर.बिराजदार, प्रा.एम.डी.बोळेगावे आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे उपस्थित होते.
महाविद्यालयाने घेतलेल्या दर रविवारच्या सराव परीक्षेमुळे उज्वल यश मिळण्यासाठी मदत झाली. सर्व प्राध्यापकानी वेळोवेळी शंकांचे समाधान केले असे मत गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
तसेच पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोर्ड समन्वयक प्रा.व्ही.सी.पाटील यांनी केले तर आभार प्रा.के. आर सूर्यवंशी यांनी मानले.
या कार्यक्रमाला डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. अश्विनी रोडे, गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशस्वीतेसाठी नंदू काजापुरे, राजाभाऊ बोडके, अशोक शिंदे, आनंद खोपे, ज्योतीराम वलांडे आणि राम पाटील यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!