August 8, 2025

शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे खते-बियाने मिळण्यासाठी उपयोजना करावी – अक्षय गोटेगावकर

  • बीड (बाबासाहेब शिंदे) – या वर्षी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात उत्कृष्ठ दर्जाचे खते-बयाणे मिळावे या करिता प्रशासनाने उपयोजना करावे.कारण वर्ष २०२० साली मराठवाड्यात बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते.विशेषतः बीड जिल्ह्यातील शेतकरी दुबार पेरणीमुळे प्रचंड संकटात सापडला होता. विशेषतः शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उत्कृठ दर्जाचे मिळणे गरजेचे आहे व खते-बियाणे उपलब्ध असताना सुद्धा ती शेतकऱ्यांना मिळत नाहीत.काही व्यापारी खते व बियाणे एकाच वेळेस घेणे अनिवार्य करत असतात,नाहीतर युरिया सारखे खते उपलब्ध असून सुद्धा शेतकऱ्यांना देत नाहीत. याची पुढील काळात प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे व बोगस खते-बियाणे विक्रीविरोधात तालुकानिहाय भरारी पथकांची पथकामार्फत दोषी विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते तथा ज्ञानमाता माहिती अधिकार कार्यकर्ते अक्षय गोटेगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
error: Content is protected !!