कळंब – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता १० वी) मध्ये तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब शाळेचा सलग १० व्या वर्षी १००% निकाल लागला असून, ०४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.०१ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. प्रशालेतून पुढीलप्रमाणे निकाल चेतन औटी ७३.२०%, आदित्य कोठावळे ६७.८०℅,मुकेश पवार ६५.६०℅,वैभव गिरी ६४.८०℅,संवाद घोडके ५९.२०%, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवदत्त गिरी, संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण साहेब,वै.सा.का.चव्हाण , लेखाधिकारी सुधीर जाधवर, मुख्याध्यापक बालाजी जाधवर यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशालेतील विशेष शिक्षक आश्रुबा कोठावळे, श्रीमती सुनिता गुंड, सुनंदा गायकवाड या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश