कळंब – भारतीय बौद्ध महासभा जिल्हा धाराशिव अंतर्गत दिनांक 26 मे 2024 रोजी सामाजिक दिशा व नेतृत्व निर्माण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.प्रशिक्षणात आजचा युवक व्यसन, कॅन्सर, एड्स, मानसिक तणाव, कौटुंबिक तणाव व मोबाईलचा अतिवापर यात पुरेपूर अडकलेला असून या विळख्यातून त्याला सामाजिक जाण व भान असलेल्या समाजातील जेष्ठांनी कसे बाहेर काढावे? याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले.प्रशिक्षणात आपला समृद्ध असलेला थोर समाज सुधारकांचा इतिहास तसेच समाजसुधारकांना समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झालेला त्रास त्यातून मिळालेले स्वातंत्र्य,समता व सामाजिक ऐक्य कसे टिकवून ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब येथे संपन्न झालेल्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार प्रमुख लक्ष्मण धावारे व विशाल वाघमारे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोशाबा पतसंस्थेचे संचालक महेंद्र रणदिवे यांनी करून कार्यक्रमाचे उद्देश व हेतू सांगितले. कार्यक्रमास उत्तर जिल्हाप्रमुख हनुमंत प्रतापे, सरचिटणीस अँड. दिलीप निकाळजे,अँड. किशोर पायाळ उपस्थित होते. कळंब तालुक्यातील निवडक अशा 23 गावातील भारतीय बौद्ध महासभेचे एकूण 87 कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भास्कर कांबळे, विशाल धावारे,रामलिंग साळवे,बाबासाहेब उबाळे,बालाजी धावारे,कुमार धावारे,भूम येथील कमलताई गवळी, संगीता निकाळजे, मनोज सिंगनाथ, किरण नाईकवाडे, चोकोबा वाघमारे,बालाजी वाघमारे, शामल कांबळे, कोमल सरवदे, पुष्पाताई आदमाने,हिम्मत वाघमारे लहू हिंगे,आशा धावारे, राहुल धावारे तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माजी कॅशियर अरुण लोंढे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार जोशाबा पत संस्थेचे संचालक सचिन भांडे यांनी केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले