August 8, 2025

शासनाची फसवणूक करणाऱ्या रोहयो कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – निखिल गंभीरे

  • कळंब – एका गावात MREGS अंतर्गत सार्वजनिक रस्त्याची 20 पेक्षा अधिक ची कामे चालू करण्यासाठी केंद्र सरकारच्या परिपत्रक क्र.J-11017/39/2017-RE-Vll (378816) दि.18.07.2022 सुचने नुसार ग्राम पंचायतीला एखादे काम नव्याने सुरू करावयाचे असल्यास कार्यक्रम अधिकारी योग्य त्या कारण मिमांसेसह जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांना विनंती करतील व उक्त कामाला जिल्हा कार्यक्रम समन्वयक विशेष बाब आणि कामाची निकड लक्षात घेऊन मान्यता प्रदान करू शकतील .असे पत्रात नमूद आहे. वास्तविक असे न करता ग्रा.प ईटकुर येथील रोजगार सेवक आणि मगांराग्रारोहयो पंचायत समिती कॉप्यूटर ऑपरेटर यांनी संगणमत करून जिल्हा समन्वयक यांची परवानगीं न घेता. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची दिशाभुल करून शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली करून अधिकचे कामे चालू केली . तरी यावर तात्काळ दखल घेऊन कठोर कार्यवाही करण्यात यावी.संबंधितांवर शासनाची व जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी इंडियन पिनल कोर्ट – कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार निखिल गंभिरे यांनी केली आहे.
    याच कारणास्तव पंचायत समिती कार्यालय कळंब येथे मंगळवार दि.28 मे 2024 रोजी पासून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!