धाराशिव (जिमाका) – राज्य शासनाच्या महाडिबिटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या शिर्षाखाली बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या सुविधेअंतर्गत लाभार्थीला येत्या खरीप हंगामात राष्ट्रीय खाद्य तेल अभियानातंर्गत पिक प्रात्यक्षिक बाबीअंतर्गत 0.40 आर करिता 22 किलो सोयाबीन प्रमाणित बियाणे 40 रुपये प्रति किलो अनुदानानर उपलब्ध आहे.तसेच प्रमाणित बियाणे वितरण बाबीअंतर्गत 20 रुपये प्रति किलो प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तुर,मुग व उडीदच्या 10 वर्षाआतील वाणाकरिता 50 रुपये किलो व तुर ,मुग, उडीदच्या 10 वर्षावरील वाणाकरिता 25 रुपये किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे.तसेच तुर,मुग,उडीद पिक प्रात्याक्षिकाकरिता 0.40 आर करिता 100 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अन्न व पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत बाजरी व खरीप ज्वारी पिक प्रात्यक्षिकाकरिता 0.40 आर करिता 100 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.प्रमाणित बियाणे वाटप बाबीअंतर्गत बाजरी पिकाच्या 10 वर्षाच्या आतील वाण 30 रुपये किलो प्रमाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.अन्न व पोषण सुरक्षा अभियान भरड धान्य अंतर्गत मका पिक प्रात्यक्षिकाकरिता 0.40 आर करिता 100 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यानी महाडिबिटी पोर्टलवर 24 मे 2024 पर्यंत अर्ज करणे बंधणकारक आहे.जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडिबिटी पोर्टलवर अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश