August 9, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन

  • धाराशिव (नेताजी जवीर ) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने दि‌.२२ व २३ मे असे सलग दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
    दि.२२ मे रोजी पुरोगामी चळवळ आणि आजचा युवक या विषयावर सांगली येथील नितीन चंदनशिवे हे आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जरिचंद सावंत यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच
    दि.२३ मे रोजी गौतम बुद्ध पौर्णिमे दिनानिमित्त उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ.विश्वंभर गायकवाड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्धिक चरित्र : एक आकलन या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्ह्यातील अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिनकर झेंडे हे उपस्थित राहणार आहेत. ही व्याख्यानमाला धाराशिव शहरातील शाहूनगर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातील सोनाई फंक्शन हॉल येथे पार पडणार आहे. त्यामुळे या व्याख्यानमालेस जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा.रवी सुरवसे यांनी केले आहे.
error: Content is protected !!