लातूर (दिलीप आदमाने) – आपल्या देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची नियोजन प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याची अंमलबजावणी विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरू झाली आहे.तर पदवी अभ्यासक्रमासाठी २०२४-२५ पासून सुरू होत आहे. तेव्हा महाविद्यालयातील शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०चा सूक्ष्म आणि विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यास करून त्यामध्ये दिलेल्या दिलेली मूल्य आणि कौशल्य याला अनुसरून विद्यार्थी घडवावेत. यामुळे आपला देश शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध होईल असे प्रतिपादन श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूरचे नूतन अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांनी केले. श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूर द्वारा चालणाऱ्या सर्व युनिट प्रमुखांची सुसंवाद बैठक संस्था कार्यालयाच्या देशीकेंद्र विद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. यावेळी विचारमंचावर संस्थेचे सचिव माधवराव पाटील (टाकळीकर), उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसे चिंचोलीकर), सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, संचालक राजेश्वर बुके, संचालक बसवराज (राजू) येरटे, संचालक काशिनाथ साखरे, संचालक राजेश्वर पाटील, संचालक प्रभूप्पा पटणे आणि संचालक गुरुलिंग धाराशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आदिनाथ सांगवे म्हणाले की, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था द्वारा चालणाऱ्या सर्व शाळा,महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पालकांशी सुसंवाद प्रस्थापित करावा. शासन मान्य प्रवेशित तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या पूर्ण करून विनाअनुदानित तुकड्या सुद्धा पूर्ण क्षमतेने पूर्ण कराव्यात. महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांचा सन्मान करून त्यांना आपल्या महाविद्यालयाच्या गुणवैशिष्ट्याची माहिती देऊन तो आपल्या महाविद्यालयातच प्रवेश घेईल याची आपण काळजी घ्यावी. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यासोबतच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड अनिवार्य करावा.यामुळे प्रशासनामध्ये एकात्मता निर्माण होते तसेच आपली एक महाविद्यालयाविषयी स्वतंत्र ओळखही निर्माण होते असेही ते म्हणाले. यावेळी संस्थेचे सचिव माधवराव पाटील (टाकळीकर) प्रास्ताविक करताना म्हणाले की, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर ही महाराष्ट्रातील एक नामवंत आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न अशी शिक्षण संस्था आहे. या संस्थेअंतर्गत विविध शाळा आणि महाविद्यालय चालविले जातात. विद्यार्थी हा कौशल्ययुक्त आणि रोजगाराभिमुख तयार करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन समस्यांचे निराकरण करून आपले शैक्षणिक संकुल शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी प्रयत्नशील राहू. संस्था पदाधिकाऱ्यांचे आपल्याला सक्रिय आणि सकारात्मक सहकार्य नक्की मिळेल असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. यावेळी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई,एम.एस.बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.बी.व्ही.धरणे, अभियांत्रिकी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील अँक्टींग प्राचार्य डॉ.एन.ए.रावबावळे, कै. पूज्य टी.बी.गिरवलकर, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.सुदीप झिरमिरे, श्री देशीकेंद्र विद्यालय,लातूरच्या मुख्याध्यापिका जयश्री ठवळे, श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, लातूरच्या मुख्याध्यापिका सुनिता पुरी, श्री निळकंठेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूरचे मुख्याध्यापक रूपसिंग सगर, श्री शंभुलिंग शिवाचार्य माध्यमिक विद्यालय, लातूरचे मुख्याध्यापक शिवाजी कोळी, श्री शंभुलिंग शिवाचार्य प्राथमिक विद्यालय, लातूरचे मुख्याध्यापक योगीराज स्वामी, श्री महात्मा बसवेश्वर बालक मंदिर, लातूरच्या मुख्याध्यापिका राजश्री कोरपे यांच्या सह महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, प्रा. सुरेश बिराजदार, मनोज मोटे, नामदेव बेंदरगे व संस्था कार्यालय प्रमुख गुरलिंग शेटे यांची उपस्थिती होती. यावेळी उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसेचिंचोलीकर), सहसचिव सुनील मिटकरी, संचालक राजेश्वर बुके, संचालक बसवराज (राजू) येरटे, संचालक काशिनाथ साखरे, संचालक राजेश्वर पाटील, संचालक प्रभूप्पा पटणे, संचालक गुरुलिंग धाराशिवे यांनीही सर्व युनिट प्रमुखांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व युनिट प्रमुखांनी शाळा व महाविद्यालयातील प्रवेशित शासन मान्य संख्या, प्रवेशित संख्या, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पायाभूत सोयीसुविधा व इतर शैक्षणिक विकासाची सविस्तर माहिती दिली. बैठकीनंतर सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचा युनिट प्रमुखातर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. शेवटी सर्वांचे आभार मनोज मोटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रमुख गुरुलिंग शेटे, सागर खराडे, शुभम वारद, चंद्रसेन सूर्यवंशी, नागेश चौधरी, गलगले आप्पा, राजाभाऊ बोडके आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे