September 13, 2026

महाराष्ट्र लोकविकास मंच कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

  • @ खरीप हंगामात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते वाटपाची केली मागणी
  • कळंब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात मागील वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पावसाने पार दांडी मारल्याने महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी परिस्थितीत उपाय योजना जाहीर केल्या आहेत. खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न घेता आले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे लागवडीसाठी व खते मोफत उपलब्ध करून द्यावे. सक्रिय महाराष्ट्राचे पालक म्हणून कार्य करावे.शेतकर्यांची होणारी हाल अपेष्टा पहावत नाही.जे गावात मजुर आहेत त्याना गावात रोजगार मिळत नाही. मजुराचे हाल होत आहेत. निव्वळ मजुरीवरती असणारी मजुरांची पोटं आता उपाशी मरायला लागली आहेत. साखर कारखान्यावरून आलेले मजूर यांना सध्या दोन हाताला काम मिळने अत्यंत गरजेचे आहे. उपासमारीची वेळ आता लोकांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ताबडतोब रोजगार हमीची कामे गावागावात सुरू करावीत अशी विनंती आहे.
    खरीप हंगाम जून २०२४ ला जेव्हा पेरण्या सुरू होतील तेव्हा पेरणी पूर्वी मोफत बियाणे व खते उपलब्ध करण्यात यावी. यातुन शेतकऱ्यांना आपली मदत होईल आणि उत्पन्न घेणे सोईचे होईल अशा आशियाचे ईमेल महाराष्ट्र लोक विकास मंच कडून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर आणि सचिव भूमिपुत्र वाघ यांनी दिली.
error: Content is protected !!