August 9, 2025

भगवंत जयंती (प्रगट दिन ) निमित्त नामसंकीर्तन महोत्सव

  • कळंब (माधवसिंग राजपूत ) – प्रति वर्षाप्रमाणे भगवंत विठ्ठल मंदिर कळंब येथे भगवंत जयंती (प्रगट दिन) निमित्त नामसंकिर्तन महोत्सवाचे ( दिनांक १८ मे ते दिनांक २१ मे) आयोजन करण्यात आले आहे.
    यानिमित्त काकडा आरती ,भजन, किर्तन,ज्ञानेश्वरी पारायण आदी कार्यक्रम संपन्न होत आहेत.
    दिनांक १८ मे व दिनांक १९ मे ह.भ.प.स्वानंद बेदरकर यांचे व्याख्यान, आयोजक (युवक आघाडी कळंब ) दिनांक २० मे रोजी भगवंत जयंती समयी पहाटे महेश आप्पा मुंडे व श्रीकिशन मुंडे यांच्या हस्ते भगवंताची महापूजा संपन्न होईल तर प्रसाद महाराज सहस्रबुद्धे यांचे किर्तन पहाटे ४ ते ५ या वेळेत होईल तर २० मे रोजी श्रीधर बुवा रामदासी यांचे व दिनांक २१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत श्रीराम श्रीधर बुवा रामदासी यांचे काल्याचे किर्तन होईल. पुष्पलता गौतमराव माने ,किरण माने यांच्या स्मरणार्थ गिरीषराव माने यांची दुपारी महापंगत होईल.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर बारटक्के, ज्ञानेश्वर बारटक्के ,प्रकाशराव मोरे गुरुजी, विलास मिटकरी, पांडुरंग माळवदे, मुरलीधर काका चोंदे, परिश्रम घेत आहे या भगवंत जयंती उत्सव सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन ह. भ. प .जीवनराव महाराज रत्नपारखी मंदिर पुजारी यांनी केली आहे.
error: Content is protected !!