August 8, 2025

दिनेश सातपुते यांना पीएचडी प्रदान

  • कळंब – दिनेश परशुराम सातपुते कळंब यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च अहमदाबाद या विद्यापीठाने मेडिसिनल केमिस्ट्री या विषयात पीएचडी ही पदवी प्रदान केली आहे. त्यांनी अँन्टी कॅन्सर ड्रग तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलवर संशोधन करून शोध प्रबंध सादर केला आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण कळंब येथे झाले आहे. पुढील पदवीपर्यंत शिक्षण नाशिक मध्ये तर पदवीत्तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च हैदराबाद येथे पूर्ण केले आहे.त्यांनी हा शोध प्रबंध डॉ.दिनेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. या यशाबद्दल दिनेश सातपुते यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!