August 8, 2025

शिक्षकांनी निरीक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून कार्य करावे – प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई

  • लातूर (दिलीप आदमाने) –
    ४१-लातूर लोकसभा मतदारसंघ (अ.जा.), लातूर अंतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये दि.०७ मे २०२४ रोजी विविध बुथवर मतदान होत आहे.या बुथवर शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी निरीक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून कार्य करून निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांनी केले.
    जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी, लातूर आणि राष्ट्रीय सेवा योजना, महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसभा मतदार संघ बूथ सदस्यांची बैठक प्राचार्य कक्षामध्ये संपन्न झाली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
    यावेळी उपप्राचार्य प्रा.संजय पवार,पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. किसनाथ कुडके, प्रा. विश्वनाथ स्वामी,प्रा.रवींद्र सुरवसे, प्रा.देविदास वसावे,प्रा.एस.एस. कानडे, प्रा.डी.जे.बजाज आणि प्रा. वैशाली जयशेटे यांची उपस्थिती होती.
    पुढे बोलताना प्राचार्य डॉ.गवई म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या लोकशाही उत्सवांमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन आपल्या लातूर जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. मतदान ही आपली एक नैतिक जबाबदारी समजून लोकशाहीला सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी समाजात जाणीव जागृती करावी असे असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. किसनाथ कुडके यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे यांनी मानले.
    या प्रक्रियेमध्ये कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील ९१ विद्यार्थी आणि नऊ प्राध्यापकाचा समावेश आहे. यासंबंधीची विद्यार्थ्यासोबतची बैठक दि. ३० एप्रिल २०२४ रोजी दु. १.०० वाजता आयोजित करून त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेची सर्व माहिती दिली जाणार आहे असे ठरविण्यात आले.
error: Content is protected !!