लोहटा – कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लोहटा (पश्चिम ) येथे दि.२८ मार्च २०२४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षिस वितरण करण्यात आले. सर्व प्रथम सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.हनुमंत माने (छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब),सोपान पवार (साने गुरुजी कथामाला कळंब ता.अध्यक्ष),आश्रुबा कोठावळे, बाल साहित्यिक,संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधीर वि.कळंब व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता अनपट उपस्थित होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्टकार्य करणाऱ्या व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कवी आश्रुबा कोठावळे बोलतांना म्हणाले की, पाठ्यपुस्तकाबरोबरच आवांतर वाचन करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांची पुस्तक वाचावीत. तसेच त्यांच्या शब्दपेरणी या बालकवितासंग्रहातील कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली व त्यांच्याच “कथांचे बीजगोळे ” या बाल कथासंग्रहातील कथांची माहिती दिली.मुलांनी कविता, कथा वाचल्या पाहिजेत असे ही त्यांनी सांगितले. प्रा.हनुमंत माने यांनी मुलांनी कसे वागावे,काय खावे,काय खाऊ नये व आई वडिलांचे व शिक्षकांचे स्वप्न पुर्ण करावे असे मार्गदर्शन केले. तसेच पवार सरांनी शाळा तेथे कथामाला या उपक्रमात साने गुरुजी कथामालेची शाखा स्थापन केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष लिमकर यांनी केले व आभार गोविंद टेळे यांनी मानले. यावेळी विजयकुमार कोठावळे,प्रकाश शिंदे, प्रतिभा पवार इ.कर्मचारी व विद्यार्थी,पालक उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले