August 8, 2025

भैरवनाथ आयटीआयच्या प्रशिक्षणार्थींची परळीतील औष्णिक विद्युत केंद्रास भेट

  • कळंब (राजेंद्र बारगुले) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छत्रपती संभाजी राजे नगर येथील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थींच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडावी याकरिता भैरवनाथ आयटीआयच्या वतीने दि.२८ मार्च २०२४ रोजी औष्णिक विद्युत केंद्र,परळी जि.बीड येथे उत्साहात औद्योगिक भेट संपन्न झाली.
    यामध्ये औद्योगिक भेटीत प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षेसाठी महाजनको तर्फे प्रत्येक प्रशिक्षणार्थीस सेफ्टी हेल्मेट देण्यात आले होते. तसेच कोळसा हाताळणी प्लांट,त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्यांची देखभाल याची माहिती देण्यात येवून विविध यंत्र सामुग्री दाखवण्यात आली व प्रात्यक्षिक भाषेत समजण्यात आली.
    या भेटीमध्ये प्रशिक्षणार्थींना
    उष्णतेचा वापर करून पाण्याची उच्च दाबावर वाफ कशी बनवली जाते व या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनरेटर फिरवायला केला जातो.जनरेटर फिरले की वीज निर्मिती होते या सर्व प्रक्रिया दाखविण्यात आल्या.
    औद्योगिक क्षेत्र भेट यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक प्रा.सागर पालके,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक कोमल मगर,आदित्य गायकवाड, विनोद कसबे यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!