August 8, 2025

कळंब शहरातील काही भागांत दुर्गंधी युक्त पाणी

  • स्थानिक स्वराज्य संस्थातील कळंब प्रशासनाचा तुघलकी कारभार
    कळंब (महेश फाटक) – शहरातील काही भागांत दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
    कळंब शहराला शुद्ध पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या योजनेतून शहरातील बाबा नगर,चोंदे नगर आदी भागांत मागील आठ दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. या पाण्याचा नालीच्या पाण्यासारखा वास येत असून नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.याकडे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
    स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाल संपूनही शासनाच्या असंविधानिक कारभारामुळे निवडणूका लागत नाहीत आणि निवडणुका नसल्याने प्रशासनावर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नसल्यामुळे प्रशासनाचा तुघलकी कारभार चालू आहे.
error: Content is protected !!