- “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
- धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.24 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 243 कारवाया करुन 1,77,700 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
- “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
- मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल रविवार दि.24.03.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 07 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 20 लि. गावठी दारु, सिंधी ताडी 40 व देशी विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य व कार जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 15,340 ₹आहे.यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 07 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
- 1)कळंब पो.ठाणेच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अनिल रोहीदास गाडे, वय 52वर्षे, रा. आंदोरा ता. कळंब, जि. धाराशिव हे 12.50 वा. सु. हॉटेल गारवा चे पाठीमागे आंदोरा येथे अंदाजे 770 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे- लक्ष्मण रंगा शिंदे, वय 60 वर्षे, रा. चवाळी पारधी पीडी वाकडी के. ता. कळंब जि. धाराशिव हे 19.00 वा. सु. आपल्या पत्रयाचे शेड समोर अंदाजे 7,500 ₹ किंमतीचे 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले. आरोपी नामे-संजय ज्ञानोबा सोनवणे, वय 45 वर्षे, रा. ब्रम्हाचीवाडी ता. कळंब, जि. धाराशिव हे 18.10 वा. सु. मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रियल जवळ हॉटेल महाराष्ट्रच्या समोर मोहा शिवार येथे अंदाजे 700 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-अनिल रोहीदास गाडे, वय 52 वर्षे, रा. भाटसांगवी ता. कळंब, जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. अन्नपुर्ण हॉटेल शेजारी कळंब शिवार अथर्डी रोड अंदाजे 570 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 3 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
- 2)धाराशिव ग्रामीण पो.ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सुमन दशरथ चांदणे, वय 58 वर्षे, रा. देवळाली ता. जि. धाराशिव या 13.30 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 950 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे- अंजली दत्तात्रय पवार, वय 40 वर्षे, रा. येडशी ता.जि. धाराशिव हे 19.20 वा. सु. भवानी चौक येडशी येथे अंदाजे 650 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
- 3)उमरगा पो.ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-राजेंद्र अंगत कांबळे, वय 46 वर्षे, रा. एकुरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 20.00 वा. सु. गुळ कारखाना शेड समोर एकुरगा रोडचे बाजूला अंदाजे 4,200 ₹ किंमतीची 40 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले.
- “ जुगार विरोधी कारवाई.”
- धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.24.03.2024 रोजी 11.30 वा. सु. आठवडी बाजार पत्रयाचे शेडचे बाजूस धराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- संजय उर्फ बंटी राजाभाउ पेठे, वय 24 वर्षे, रा. शेरखाने गल्ली धाराशिव, 2) अमर धनंजय कसबे, वय 25 वर्षे, रा. लहुजी चौक धाराशिव ता. जि. धाराशिव हे 11.30 वा. सु. आठवडी बाजार पत्रयाचे शेडचे बाजूस धाराशिव येथे स्ट्रायगर मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 520 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
- “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
- परंडा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)सोमनाथ राजाराम तोपसांगवे, वय 27 वर्षे, रा. मलकापुर ता. परंडा जि. धाराशिव हे दि.24.03.2024 रोजी 13.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 16 बीजे 2865 ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परंडा येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
- “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
- उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- मंगेश बालाजी भोरे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव, हे दि.24.03.2024 रोजी 19.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एम 1711 ही आरोग्य नगर कॉर्नर एनएच 65 वर उमरगा येथे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
- “ सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.”
- शिराढोण पोलीस ठाणे : सार्वजनिक ठिकाणी हॉटेल, हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणे, या व्यक्तींवर बेंबळी पोलीसांनी काल दि. 24.03.2024 रोजी 12.40 ते 12.55 वा. सु. एकुण 3 कारवाया केल्या. यात आरोपी नामे 1) सय्यद जहीर रशिद, वय 40 वर्षे, रा. रांजणी ता. कळंब जि. धाराशिव, 2)अलीम खाजु शेख, वय 27 वर्षे, रा. रांजणी ता. कळंब जि. धाराशिव, 3)सय्यद खाजा रशीद, वय 43 वर्षे, रा. रांजणी, ता. कळंब जि. धाराशिव या तिघांनी रांजणी येथे पटेल चौक सहारा हॉटेलच्या समोर, रांजणी येथे कळंब ते लातुर रोडवर, पटेल चौक रांजणी येथे अतीक हॉटेल समोर येथे रोडलगत आपपल्या हॉटेलमध्ये गॅस शेगडीत निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करत असताना शिराढोण पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 285, अंतर्गत शिराढोण पो.ठा. येथे 3 गुन्हे नोंदवले आहेत.
- “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
- कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- लखन मुंजाजी कोलगणे, वय 31 वर्षे, रा. सोन्ना ता. जि. परभणी ह.मु. शासकीय निवासस्थान प्रा. आ. केंद्र ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांचे शासकिय निवासस्थान प्रा.आ. केंद्र ईटकुर येथील राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.21.03.2024 रोजी 17.00 ते दि.22.03.2024 रोजी 08.30 वा. सु. तोडून होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएच 22 एएस 7725, एक एलईडी टिव्ही, लिनेव्हो कंपनीचा टॅब तसेच पांडुरंग आश्रुबा फरताडे, वय 33 रा. ईटकुर यंचे पांडुरंग मशिनरी स्टोअर्स चे दुकान उघडून दुकानातुन संलोचनचे कॅड, पक्कड, मारतुल असा एकुण 59,796 किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लखन कोलगणे यांनी दि.24.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
- ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर दत्तु साळुंके, वय 44 वर्षे, रा. थोडसरवाडी ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची टिव्हीएस स्पोटर्स मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 6704 ही दि. 19.03.2024 रोजी 20.30 ते दि. 20.03.2024 रोजी 05.30 वा. सु. ज्ञानेश्वर साळुंके यांचे शेत गट नं 82 मध्ये मुळेवाडी शिवार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर साळुंके यांनी दि.24.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
- “ फसवणुक.”
- वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- दत्ता परसु पवार, वय 34 वर्षे रा. ज्योतीबाचीवाडी ता. भुम जि. धाराशिव यांनी आरोपी नामे- 1)गहीनिनाथ सुखदेव देवडीकर, वय 42 रा. आडगाव ता. जि. बीड, 2) रामभाउ ई. हातवाटे, वय 36 वर्षे, रा. खुंडूस ता. जि. बीड, 3) कल्याण आश्रुबा चन्ने, वय 41 वर्षे, रा. गुंडेवाडी पो. पिंपळनेर ता. जि. बीड, 4) मे श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स को.लि. शिवजीनगर पुणे तर्फे शाखा व्यवस्थापक पहिला मजला साई पॅलेस हॉटेल समोर बीड यांचे दि. 17.02.2022 रोजी ते दि. 12.12.2022 व आज पावेतो जनहितम मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी बॅक शाख ई ता. भुम व बीड व आर टी ओ ऑफीस बीड येथे आरोपी गहिनीनाथ देवडीकर, रामभाउ हातवाटे यांचे कडून ट्रॅक्टर, डंपीग ट्रॉली व नांगर हे 6,90,000₹ ला खरेदी केले. सदरचा वाहन खरेदीचा करारनामा ॲड नोटरी केकान जी एम जी बीड यांचेकडे रजि. नं 140/22 अन्वये नोंदवुन देवून आरटीओ एनओसी च्या नावाने जादा 2,00,000 ₹ हात उसने घेवून त्या बदल्यात बॅक ऑफ चा चेक दिला पंरतु सदर चेक न वटल्यामुळे फिर्यादीची फसवणुक केली. व सदर ट्रॅक्टर परस्पर विक्री करुन त्यावर मे श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स को. लि. शिवाजीनगर पुणे तर्फे शाखा व्यवस्थापक साई पॅलेस हॉटेल समोर बीड यांचे लोन घेवून आज पावेतो फिर्यादीचे नावावर करुन न देता 8,75,000 ₹ची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्ता पवार यांनी दि.24.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 406, 409, 418, 420, 463, 464, 465, 467, 468, 471, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
- “ मारहाण.”
- नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)गुलाब तुकाराम बिराजदार, 2) नागनाथ तुकाराम बिराजदार, 3) माधुरी गुलाब बिराजदार, 4) जयश्री नागनाथ बिराजदार रा. वागदरी ता. तुळजापूर जि. धाराशिव दि.23.03.2024 रोजी 09.00 वा. सु. वागदरी येथे फिर्यादी नामे- मुक्ताबाई विलास बिराजदार, वय 48 वर्षे, रा. वागदरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचा दिर बालाजी यांना सार्वजनिक नळाला पाईप का लावला या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मुक्ताबाई बिराजदार यांनी दि.24.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला