August 8, 2025

धाराशिव मध्ये तणावाची परिस्थिती -दोन गटात दगडफेक

धाराशिव – धाराशिव शहरात दि.२५ मार्च २०२४ दोन गटात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, दोन गट आमनेसामने आल्याने पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.काही भागात दगडफेक झाली आहे.
धाराशिव शहरातील गणेश नगर,खाजा नगर भागात सोमवारी सायंकाळी दोन गटात दगडफेक झाली असून,दगडफेकीचे कारण समोर आलेले नाही. मात्र पोलिसांनी वेळीच दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीसांच्या वतिने करण्यात आले आहे.
या दगडफेकीत काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

error: Content is protected !!