August 9, 2025

विश्वनाथ तोडकर यांचा माळी समाजाकडून सत्कार

  • कळंब – पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक आणि जमीन अधिकार आंदोलनाच्या चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांची महाराष्ट्र लोकविकास मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल दि.०१ ऑक्टोबर रोजी पर्याय कॅम्पस येथील सभागृहात भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी शाहीर बंडू खराटे यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर करून विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या जीवनचरित्रा वरती पोवाडा गायला.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विलास गोडगे यांनी केले, हसेगाव के.येथील ज्ञानेश्वर तोडकर,आत्माराम तोडकर यांच्यासह माळी समाज बांधवानी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच बीड,लातूर, परभणी,हिंगोली,नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी भेटून सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी कळंब येथील शिक्षक संतोष भोजने आणि त्यांचे सहकारी तसेच पर्याय आणि अनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा.ली.चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!