August 9, 2025

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात संपन्न

  • धाराशिव – राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादुर शास्त्री यांची जयंती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाचे सन्मानीय कुलगुरू प्रा. डाॅ. प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी पुष्पअर्पण केले. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक अहिंसा दिन, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त “स्वच्छता ही सेवा” उपक्रमांतर्गत श्रमदान करण्यात आले. आपला संपुर्ण परिसर स्वच्छ राखणे आपल्याच सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता हि यशाची गुरुकिल्ली आहे. स्वच्छता दैनंदिन जीवनाचा महत्वाचा घटक आहे, असे कुलगुरू प्रा.डाॅ.प्रमोद येवले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले. उपक्रमाची सुरूवात कुलगुरू प्रा. प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कुलसचिव प्रा.डाॅ.भगवान साखळे, विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित, प्रा.रमेश चौगुले, प्रा.जितेंद्र कुलकर्णी, डाॅ. मेघश्याम पाटिल,डाॅ. राहुल खोब्रागडे, डाॅ. विक्रम शिंदे, वरूणराज कळसे,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

error: Content is protected !!