कळंब- शहरातील छत्रपती संभाजी राजे नगर येथील वेद शैक्षणिक संकुलातील धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील यांच्या प्रेरणेने व भैरनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात दि.०२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या व दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य सूरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे,प्रा.सागर पालके,लिपिक आदित्य गायकवाड,विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी