August 8, 2025

अनाथाची माय विजया वाघ सेवारत्न पुरस्काराने होणार सन्मानित

  • उमरगा – येथील समाज विकास संस्थेच्या निर्माता आणि वात्सल्य बालगृहातील उपेक्षित अनाथांची माय विद्याताई वाघ यांना सेवावरत्न पुरस्कार देऊन बीड या ठिकाणी गौरविण्यात येणार असल्याचे पत्र त्यांना मिळालेली आहे.पसायदान सेवा प्रकल्पाच्या वतीने पद्मश्री डॉ.सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने दिला जाणारा सेवरत्न पुरस्कार 2024 साठी विद्याताईंची निवड झालेली आहे .त्यांनी 1993 पासून सामाजिक कार्यात पदार्पण करून अनाथ, वंचित, महिला, मुलं, दुष्काळ, पाणी, भूकंप,कोविड,अशा विविध महामारीसमध्ये कार्य करून सावित्रीमाता फुले यांचा वारसा चालविला.शेतकऱ्यांचे विकासासाठी, महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकासाला मदत करणाऱ्या.विद्या ताई खऱ्या अर्थाने धाराशिव जिल्ह्याचं रत्न म्हणूनच संबोधलं जातं. अशा विद्याताई वाघ यांना बीड या ठिकाणी 9 मार्च रोजी सन्मानित करण्यात येत असल्याचे पत्र सेवा रंजना दराडे शिवा पसायदान सेवा प्रकल्पाच्या प्रमुख रंजना दराडे आणि स्त्रीशक्ती प्रतिष्ठानच्या प्रमुख जयश्री विधाते यांचे पत्र प्राप्त झाले आहे. सामाजिक आर्थिक शैक्षणिक बदलाच्या विकासाची ठरलेले महामेरू विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. महाराष्ट्र लोकविकास मंच, महिला राजसत्ता आंदोलन शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते विविध स्वयंसेवी संस्थांच्याकडून मित्रपरिवाराकडून विद्याताई यांचे अभिनंदन केले जात आहे.
error: Content is protected !!