August 9, 2025

उत्कृष्ट लेखा परीक्षक म्हणुन अनिल पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार

  • धाराशिव – शहरातील नामवंत लेखा परीक्षक अनिल पाटील यांना उत्कृष्ट लेखा परीक्षक म्हणुन दुसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल महासंस्कृती महोत्सवास पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित पर्यटन विकास समिती धाराशिवच्या पर्यटन पुरातत्वीय व पर्यटन स्थळाविषयी चित्र प्रदर्शनात त्यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी संस्थेचे अध्यक्ष युवराज नळे व ज्येष्ठ नागरिक अंकुश उबाळे यांच्या हस्ते पुष्पहार घातला तर संस्थेचे सचिव देविदास पाठक यांनी पेढे भरवुन सत्कार करण्यात आला.
    अंकुश उबाळे यांनी म्हटले की,अनिल पाटील हे उत्कृष्ट असे लेखा परीक्षक असुन सहकार विभागाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार दुसऱ्या वर्षीही यांना मिळाला ही बाब अभिनंदनीय आहे.त्यांचे सामाजिक क्षेत्रात ही काम उल्लेखनीय आहे. अनिल पाटील यांनी सत्कार केल्या बद्दल आभार मानले,यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुश उबाळे,पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे,सचिव देविदास पाठक, कार्याध्यक्ष रणजित रणदिवे,सहसचिव अब्दुल लतिफ अब्दुल मजीद,सदस्य अभिमान हंगरगेकर,उपाध्यक्ष गणेश रानबा वाघमारे, कोषाध्यक्ष बाबासाहेब गुळीग,सदस्य राजाभाऊ कारंडे,सेवानिवृत्त शिक्षक हबिबोद्दीन शेख,नामदेव वाघमारे इतर उपस्थित होते.
error: Content is protected !!