कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा.डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे मराठी विषयाचे प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योतचा विशेषांक भेट देण्यात आला. याप्रसंगी भैरवनाथ औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे-चोंदे,निदेशिका कोमल मगर,प्रा.सागर पालके,निदेशक विनोद जाधव,निदेशक अविनाश म्हेत्रे,आदित्य गायकवाड,विनोद कसबे,छात्राध्यापक बालाजी कोरे,छात्राध्यापिका साक्षी वायसे,साक्षी सोनवणे,वैष्णवी सुरवसे,सुप्रिया चव्हाण आदी वेद शैक्षणिक संकुलातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी