धाराशिव (जयनारायण दरक ) – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील आरोपी नामे-संतोष लाला काळे, 2) प्रशांत उर्फ सचिन बापू पवार 3) अभिजीत उर्फ ताकऱ्या शंकर पवार 4) चंदु रमेश काळे 5) आर्यन ऊर्फ काळ्या अमोल काळे 6) विकास उर्फ बहिऱ्या मच्छिद्रं काळे, 7)राजेंद्र उर्फ राजा बप्पा काळे 8) रोशन उर्फ अभिदादा संतोष्ज्ञ काळे 9) रोशनी संतोष काळे 10) प्रिती भिमा काळे, 11) माया संतोष काळे 12) नानाबाई मच्छिंद्र काळे 13) आशा सतिश काळे व इतर महिला सर्व रा. लक्ष्मी पारधी पीढी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.03.03.2024 रोजी 05.00 वा. सु. लक्ष्मी पारधी पीढी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव येथे नमुद आरोपी येरमाळा पो ठाणे गुरनं 31/2024, 32/2024 मधील पाहिजे आरोपीस तपास कामी ताब्यात घेवून जात असताना नमुद आरोपींनी हा कोयता घेवून पोलीसांचे अंगावार धावून येवून पोलीसांना धक्काबुक्की करुन ताबा घेण्यास प्रतिकार करुन बेकायदेशीरित्या एनएच 52 रोडवर तेरखेडा येथे रोडला आडवून येणारे जाणारे वाहने आडवले व पोलीसांचे वाहनावर दगडफेक केली अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कमलाकर भिमराव सुरवसे, पोलीस अमंलदार 1773 नेमणुक पोलीस ठाणे येरमाळा यांनी दि.03 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 308, 353, 224, 225, 324, 323, 504, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. सह8 (ब) राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
More Stories
शिवशक्ती सहकारी साखर कारखानाच्या वतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार
वाशी येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविले
हनुमंत पाटुळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित