धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यवसायिक यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद ७ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल ॲपल,एम.आय.डी.सी. येथे आयोजन केले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेत आणि जिल्हाधिकारी.डॉ.सचिन ओंम्बासे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होणार आहे. जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यवसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयाला विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्हयाच्या आणि राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेच्या आयोजनामागील उद्देश आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये जिल्हयातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र,गुंतवणूकीच्या संधी,इतर क्षमता असलेल्या क्षेत्रातील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम,उद्योजकांचे अनुभव इ.बाबींचा समावेश आहे.त्यात प्रतिनिधीक स्वरुपात जिल्हयाच्या उत्पादनांचे प्रदर्शन,निर्यातक्षम उत्पादने,भौगोलिक मानांकने, असलेली उत्पादने,एक जिल्हा एक उत्पादन,जिल्हयातील स्थापित औद्योगिक समुह,विविध योजनांचे लाभार्थी यांची उत्पादने यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,मैत्री कक्ष,उद्योग संचालनालय,मुंबई सीडबी बैंक,जिल्हयातील बँका, जिल्हयातील उद्योजक संघटना, शैक्षणिक संस्था,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,मिटकॉन,कौशल्य विकास व रोजगार आणि जिल्हयातील संबंधित शासकीय यंत्रणांचे प्रमुख यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात येत आहे. तरी जिल्हयातील सर्व उद्योजक संघटना,उद्योजक,शेती उत्पादक संस्था व नव उद्योजक यांनी गुंतवूणक परिषदेस उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला