धाराशिव (साक्षी पावनज्योत ) – जिल्हा महासंस्कृती महोत्सवास दि.२९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे व जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करुन सुरुवात झाली.या महोत्सवात पर्यटन स्थळे विषयक माहिती चित्र प्रदर्शन, शिवकालीन शस्त्रे व फोटो पोलीस विभागाचे रायफल प्रदर्शन, महिला बचत गट, विविध विभागांचे स्टाॅल,खाद्य पदार्थ स्टाॅल भरविण्यात आले आहे, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात प्राथमिक आरोग्य केंद्र व अँम्बुलेंस ची व्यवस्था करण्यात आली आहे, आरोग्य केंद्रास रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ अब्दुल मजीद व ईथीकल कमिटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सदस्य गणेश रानबा वाघमारे यांनी भेट दिली,आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी,सिस्टर सह यंत्रणेची माहिती घेतली, आलेल्या नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले तर सदर कर्तव्य बजावत असणा-या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यात रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ अब्दुल मजीद, ईथिकल कमिटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सदस्य गणेश रानबा वाघमारे, लहुजी पॅथर जिल्हाध्यक्ष देवानंद एडके,पर्यटन विकास समितीचे कोषाध्यक्ष,बाबासाहेब गुळीग,सदस्य,राजाभाऊ कारंडे,साहित्यिक लेखक विजय गायकवाड वैद्यकीय अधिकारी,ब्रदर,अँम्बुलेंस चालक व इतर सहकारी उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला