September 24, 2026

युवक शिबिरात मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

  • लातूर (दिलीप आदमाने) – महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, लायन्स क्लब,लातूर व लायन्स उदयगिरी नेत्र रुग्णालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास विशेष युवक शिबिराच्या अंतर्गत मोफत नेतृत्व तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मौजे जवळा (बु.) येथे संपन्न झाले.
    या शिबिरामध्ये एकूण ४९ नेत्र रुग्णावर चिकित्सा करून डोळ्याची नियमित घ्यावयाची काळजी यासंदर्भात माहिती देण्यात आली. या शिबिरात डॉ. तेजस, डॉ.राहुल अलमकेरे, डॉ. मनोज कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले.
    यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ.मनोहर चपळे, प्रा.किसनाथ कुडके, सरपंच चनबस भुजबळ, उपसरपंच मनोज कापरे आदीची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. इंगळे राखी हिने केले तर आभार डॉ.शिवप्रसाद डोंगरे यांनी मानले. या शिबिराच्या यशस्वीतेकरिता ग्रामस्थ आणि शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!