कळंब – कळंब शहर येथील श्री संत गुरु रविदास महाराज मंदिर विद्यानगरी कळंब येथे दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम श्री संत रविदास महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रंगनाथ कदम,महादेव ठोंबरे, बाभळगावकर महाराज, शिवाजी शिंदे सर होते. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.जालिंदर लोहकरे, प्रा.मधुकर माने,जिल्हाध्यक्षा आशा सुरवसे यांनी संत रविदास महाराज यांच्यबद्दल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम यांनी केले. यावेळी लवकरच श्री संत गुरु रविदास महाराज जयंती उत्सव 2024 साजरा करण्याचे सर्वांच्या वतीने ठरविण्यात आले. यावेळी विनोद बेलगावकर, मधुकर क्षिरसागर,भिकचंद शेवाळे,विलास सुरवसे,नरहरी लोहकरे, बाबुराव पाखरे, गोकुळ शिंदे,विक्रम शेवाळे,जनार्दन शिंदे, परमेश्वर कदम, गोपाळ वनकळस, कलावती कदम, सुरेखा लोहकरे,जयमाला बोबडे, स्नेहा शिंदे,श्याम शिंदे,नवनाथ जगताप, हनुमंत कांबळे, कांबळे ताई, स्वप्निल कांबळे, हरिदास बनसोडे, भीमराव शिंदे, मनीषा कांबळे, शैला पाखरे , सावित्री कदम, नागरबाई लोहकरे, सुरेखा साबळे, इंदुबाई शिंदे यांच्यासह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले